वैराटगड निवासिनी श्री काळूबाई माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी : मंदार वैद्य
म्हसवे, ता. जावळी : जावळी तालुक्यातील म्हसवे गावातील वैराटगड निवासिनी श्री काळूबाई माऊलीचा ‘श्री काळूबाई श्रावणी पूजा महोत्सव २०२६’ यंदाही मोठ्या भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
हा धार्मिक सोहळा शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री काळूबाई मंदिर, काळूबाई पाटी, वैराटगड, म्हसवे, ता. जावळी येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्री काळूबाई माऊलीच्या दर्शनासाठी जावळी तालुक्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
उत्सवाच्या दिवशी भाविकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि इष्टमित्रांसह आवर्जून उपस्थित राहून श्री काळूबाई माऊलीचे दर्शन घ्यावे, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि काळूबाई भक्त परिवार, म्हसवे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
‘काळूबाईच्या भक्तीत दंग होऊया, दर्शनाचा सुवर्णलाभ घेऊया!’ या भक्तिमय भावनेतून सर्व भाविकांनी या श्रावणी पूजा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | जावली

टिप्पणी पोस्ट करा