प्रतिनिधी / श्री.लालासाहेब माने (पाटील)
खटाव : दि.११/१२/२०२४ रोजी दुपारी कातरखटाव ता. खटाव जि. सातारा येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडुन घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच दि.१५/१२/२०२४ रोजीचे दुपारी तडवळे ता. खटाव येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेल्याने अज्ञात चोरटयाविरुध्द वडूज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते.
सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तांत्रिक आणि गोपणीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपी इब्राहीम अब्बास अली शेख वय २५ वर्षे रा. सुर्यवंशी मळा कराड ता. कराड जि. सातारा याने केला असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने वडूज पोलीस पथकाने कराड, कडेगाव जि.सांगली याठिकाणी सतत तीन दिवस अहोरात्र साध्या वेशात यातील संशयीत इब्राहीम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्या उठण्याचे ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवरुन त्याचे मूळ गावी विजापूर राज्य कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा कराड येथील कार्वे नाका परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतलं.
सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे सांगितले. त्यास अटक करुन त्याचेकडून वडूज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १) ३९०/२०२४ यामधून चोरीस गेलेले मणीमंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची बोरमाळ, कानातील सोन्याचे झुमके व वेल, दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा तसेच गुन्हा रजिस्टर नंबर २) ३९४/२०२४ यामुधन चोरीस गेलेले सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा गुन्हयातील एकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज व ७०००/- रोख रक्कम असा दोन्ही गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीविरुध्द यापूर्वी कराड तालुका, उंब्रज, ढेबेवाडी पोलीस स्टेशन जि. सातारा तसेच कासेगाव, विटा, चिंचणी वांगी जि.सांगली व कोडोली जि. कोल्हापूर येथे घरफोडीचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. मा. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, श्रीमती अश्विनी शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक, रुपाली मोरे म.स.पो.नि., रामचंद्र कांवळे, पो.उ.नि. रणधिर कर्चे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, शशिकांत काळे, अमोल चव्हाण, किरण चव्हाण, मोहन नाचण, प्रमोद चव्हाण, गजानन तोडकर, प्रशांत ताटे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सत्यवान खाडे, जयदिप लवळे, प्रिती पोतेकर, दिनानाथ जाधव, अमोल निकम व पोलीस पथक यांनी केली आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खटाव (सातारा)




Post a Comment