वैभव माने मित्र परिवाराच्या वतीने आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयोश्री योजनेची मोफत नोंदणी उत्साहात संपन्न

कराड / सातारा प्रतिनिधी श्री.अनिल मोरे


कराड : येथील वैभव माने, मित्र परिवाराच्या वतीने तसेच कराड - दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले,यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयोश्री योजनेची मोफत नोंदणी कै. बबलू माने (आबासाहेब ) चौक, येथे उत्साहात संपन्न झाली. या मोफत नोंदणी कार्यक्रमावेळी स्थानिक नागरिकांनी व विशेष करून महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे लक्षात घेता.मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 


या योजनेचे नागरिकांनी आपल्याला होणारे फायदे लक्षात घेतल्यानंतर हा कार्यक्रम राबवणारे वैभव माने, मित्र परिवाराचे व वैभव माने, यांचे तसेच कराड -दक्षिणचे नवनिर्वाचित -आमदार डॉ. अतुल भोसले,यांचे भरभरून कौतुक, केले. या कार्यक्रमा वेळी बोलताना वैभव माने, पुढे म्हणाले. आयुष्यमान भारत ही लोकप्रिय योजना डॉ.अतुल भोसले,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाजातील गोरगरीब सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होत आहे. तसेच या पुढच्या काळामध्ये भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना असो, किंवा महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना असो,तसेच नमो शेतकरी सन्मान योजना असो, अशा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या समाज हिताच्या विविध योजना तळागळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वैभव माने मित्रपरिवार सातत्याने करणार आहे.


 या कार्यक्रमावेळी वैभव माने मित्र परिवाराचे शिवराज माने, ऋषिकेश शेंद्रे,बंटी वाघ, अक्षय कांबळे, सागर माने, सुरज धुमाळ, अजय रायते, अभिजित जाधव, महेश घाडगे, अक्षय शेंद्रे, विशाल कांबळे, अवधूत बर्गे, निखिल मोहिते, हे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post