म्हाते गावच्या युवकाने झाडांवरील गुळंब काढून वाचविली हजारो झाडे

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी

म्हाते (खुर्द) : जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावच्या एका युवकाने हाजारो झाडे रोगमुक्त करण्याची संकल्पना केली संकल्पनाच सुंदर असली, की ती साकारते या प्रमाणे संपूर्ण पर्यावरणप्रेमी विश्वात एक अनुकरणीय उदाहरण स्थापन करणारे सुशांत भिलारे यांनी झाडांवरील गुळंब काढून तब्बल ५० हजार झाडे या रोगापासून वाचवण्याचे महान कार्य केले आहे.

म्हाते खुर्द गावचे रहिवाशी असलेले सुशांत भिलारे यांच्या या अथक परिश्रमामुळे निसर्गाचं संवर्धन होणार आहे आणि हे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा ठरत आहे. गुळंब काढून झाडांना नवजीवन देण्याचे हे कार्य फक्त झाडांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर त्यातून आपल्याला नैतिक जबाबदारीही स्पष्ट होते. 

झाडे आपल्याला प्राणवायू देतात, हवामान नियंत्रित ठेवतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. सुशांत भिलारे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यात हीच आस्था आणि निसर्गप्रेम आपल्या प्रत्येकाच्या अंत:करणात वसावी, हीच अपेक्षा सुशांत भिलारे व्यक्त करत आहे.माझ्या या कार्यात युवकांनी सहभागी होऊन निसर्गाचे रक्षण कराव अशी अपेक्षाही त्यांनी बाेलुन दाखविली.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने