नांदोशी येथे घाटमाता औंध रस्त्यालगत असलेल्या ओढ्यावर अपघात

प्रतिनिधी / श्री.महेश यादव 



औंध (सातारा) : औंध ते घाटमाता या रस्त्याचे काम चालू असून या रस्त्यावरून येत जात असताना निष्काळजीपणे वाहन चालकांकडून सजग नागरिकांना त्रास होऊ शकतो किंवा जीवही जाऊ शकतो त्यातलाच आज प्रकार झाला. 




घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात स्विफ्ट कार ने अपघातग्रस्त टेम्पो गाडीला स्पीड मध्ये कट मारल्याने तसेच रस्त्याचे सुरू असलेले काम आणि रस्त्यावर हातरलेली बारीक खडी यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट ओढ्यात पडली सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 

अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून या ओढ्यालगत असलेल्या पूलांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे. 

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / औंध (सातारा)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने