धामणेर गावची सुकन्या सुहाना शेख हिची आरोग्य महिला सेविका म्हणून निवड.

प्रतिनिधी : मेहमूद्दीन शेख 

धामणेर (कोरेगाव) : आदर्श ग्रामपंचायत धामणेर गावची सुकन्या सुहाना इनुस शेख रा.धामणेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हिची आरोग्य महिला सेविका म्हणून निवड. आदर्श ग्रामपंचायत धामणेर या गावात लहानाची मोठी झालेली सुहाना खरंच हिचा आदर्श ही घेण्यासारखा आहे. 


घरची परिस्थिती बिकट व हालाकीची असताना देखील परिस्थितीवर मात करून तीणे हे यश संपादन केले विविध प्रसंगांना न घाबरता शेवटी तिने बाजी मारली सातारा जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या सर्व सेवा भरती मध्ये पहिल्याच प्रयत्नात आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक महिला पदाची परीक्षा प्रवर्गातून उत्तीर्ण झाली. 


तिला पत्रकार शेख यांनी विचारले असता तिने आपली वस्तुस्थिती मांडली ती म्हणाली माझ्या घरची परिस्थिती बिकट होती माझ्या आई-वडिलांनी शेतात काम करून वडिलांनी मोल मजुरी करून आम्ही दोन बहिणी व आई वडील यांचे खर्च व शिक्षणाचा खर्च भागत नव्हता म्हणून मी हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट जॉब केला व शिक्षणाचा खर्च त्यामध्ये करायची कारण माझ्या शिक्षणाचा खर्च व या जायचा खर्च ते देऊ शकत नव्हते म्हणून मला माझ्या शिक्षणासाठी मला काम करावे लागले मला आई-वडिलांनी खूप धीर दिला जेव्हा मला आरोग्य विभागातर्फे माझी निवड झाली मला पत्र देण्यात आले हे मी पत्र जेव्हा घरी दाखविले मी त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहिले व माझे सारे कष्ट मी विसरूनच गेले कारण मला माझ्या कष्टाची व माझ्या आई-वडिलांच्या मेहनतीची फळ मला मिळाले.


धामणेर गावचे आदर्श सरपंच शहाजीराव शिरसागर (अण्णा) यांनी त्याची कौतुक केले व ग्रामपंचायतीचे आजी- माझी सदस्य गावातील थोर मंडळी व महिला सदस्य यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून त्याचे कौतुक केले व मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आरिफ मुलानी व हाजी शौकत भाई मुलानी दस्तगीर मुलानी अब्दुल भाई मुलानी महिला आघाडीच्या आसमा सुरज शेख व संतोष शिरसागर यांनी त्यांच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला सुहाना व तिच्या आई वडिलांनी सर्वांचे आभार मानले.











न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कोरेगाव (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post