स्मार्ट गाव म्हाते खुर्द येथे महिला मेळावा संपन्न

प्रतिनिधी : बजरंग चौधरी


मेढा (जावली) : जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथे नुकताच महिला मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीअधिकारी श्रीमती शनमुक मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांना स्वच्छता व पाणी या विषयावर विशेष व्याख्यान देवून पाणी आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.तसेच ब्रह्मकुमारी धनश्री बहीण यांच्याही अध्यात्मिक व्याख्यानाचा लाभ यावेळी महिलांना झाला. 

महिलांकडून योग व मेडिटेशन याची प्रात्यक्षिके करून घेतली गेली.या कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माझी वसुंधरा लोगोचे अनावरण करण्यात आले.प्लास्टिक वापर टाळा त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा या सामाजिक संदेशाची जनजागृती करण्यासाठी म्हाते खुर्द गावचे गोवास्थित बेन्झ ग्रुपचे मालक श्री.प्रकाश हरिबा दळवी यांनी मोफत दिलेल्या ५०० कापडी पिशव्यांचे उपस्थितांना वाटप केले.

स्मार्ट गाव म्हाते खुर्द गावची स्वच्छता,सुशोभिकरण ,सामाजिक एकता, विविध अभियान उत्स्फूर्त सहभाग,विविध ग्राम स्पर्धांमधील गावचे घवघवीत यश, विविध विकास कामे पाहुन उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच राजाराम दळवी तसेच म्हाते खुर्द ग्रामस्थ व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली) 

Post a Comment

Previous Post Next Post