दिपालीताई खोत, यांना "यशवंतराव चव्हाण समाजरत्न " पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे


कराड : "भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण" यांच्या जयंतीनिमित्त यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण समाजरत्न पुरस्कार 2025 दिपालीताई सूर्यवंशी खोत, अध्यक्ष, मुख्यमंत्री 'लाडकी बहिण 'शासकीय योजना कराड तालुका यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति सदन,( टाऊन हॉल ) येथे दुपारी 3:30 वाजता होणार असल्याची माहिती यशवंत नगरीचे संपादक विकास भोसले,यांनी दिली.

या सन्मान सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष, म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष,व डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, वरिष्ठ संपादक,राजा माने, कराड विधानसभा दक्षिण मतदार संघाचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष,धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 11 क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post