मेढा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करून त्याचेकडून ६,३००/- रूपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

प्रतिनिधी : श्री.जितीन वेंदे 


मेढा (जावली) : मा.श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी चोरी, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे उघड करणेच्या सुचना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मेडा पोलीस ठाणेचे सहा. पो. फौजदार शिंगटे यांचे अधिपत्याखाली एक विशेष पोलीस पथक तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.

दि.२३/०१/२०२५ रोजी रात्रौ. ९.०० वा.ते दि.२४/०१/२०२५ रोजीचे सकाळी ०९.०० वा. चे दरम्यान मौजे सायगांव ता. जावली येथील सचिन प्रकाश ससाणे यांचे मालकिचे स्नॅक्स सेंटर ला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रक्कम १७,०००/- रूपये असलेली लोखंडी तिजोरी सह सैमसंग कंपनिचा मोचाईल फोन असा एकुण १८,३००/- रूपये किमतीचा मुद्देमाल व फिर्यादीची कागदपत्र असा मुद्देमाल चोरून नेहले बाबत मेढा पोलीस ठाणेस अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आलेला होता.

सदर घटनेच्या संदर्भाने मिळाले गोपनिय माहीतीवरून श्री. सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे यांनी घडलेल्या घटनेबाबत मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांना माहीती देवून त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेचे खास पोलीस पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेणेस सुरवात केली. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्याण मिळालेल्या माहीतीचे आधारे संशयित इसम आदित्य विकास चव्हाण वय २० वर्षे रा. सायगांव ता. जावली जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेनंतर सदर आरोपीस अटक करून त्याचेकडून त्याने चोरून नेहलेल्या रक्कमेपैकी ५,०००/- रोख रक्कम, १,०००/- रू. किमतीचा मोबाईल फोन, व ३००/- रू. किमतीची लोखंडी तिजोरी, व कागदपत्रे असा एकुण ६,३००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


सदर कारवाई मध्ये मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा. बाळासाहेच भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे व पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, सहा. पोलीस फौजदार शिंगटे, पो.हवा. माळी ब.नं.१३६५, पो.ना. शेख ब.नं.७९६, पो.ना. रोकडे ब.नं.५०, पो.कॉ. काळे ब.नं.२५२६, पो.कॉ. वाघमळे ब.नं.१२२८, पो.कॉ. वाघमळे ब.नं.४८ यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना.शेख ब.नं. ७९६ हे करीत असून मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कड्‌कर अप्पर पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post