प्रतिनिधी : श्री मंदार वैद्य (काका)
पुसेगाव (सातारा) : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्यामार्फत स्वच्छतेतून समृद्धीकडे समाजसेवा देशसेवा घडावी याकरिता गावागावात वाडी वस्तीत शहरा मध्ये स्वच्छतेचा जागर सुरू आहे. त्यातूनच पुसेगाव येथील सेवागिरी महाराज यात्रा संपन्न झाली या यात्रा कालावधी संपन्न झाल्यानंतर प्रतिष्ठानने यात्रा परिसर महा स्वच्छता अभियाना चा अभिनव राबवत हा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे.
यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे पुसेगाव मध्ये सेवागिरी महाराज यात्रा कालावधीमध्ये संपूर्ण परिसरात मिठाईची दुकाने खेळणी व मनोरंजनात्मक व इतर विविध स्टॉल लावले जातात या यात्रा कालावधी बारा दिवसांचा असून या यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा या परराज्यातून लाखोंचा संख्येने भाविक हजेरी लावतात त्यामुळे यात्रा संपन्न झाल्यानंतर ठीक ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पहावयास मिळतो त्यामुळे परिसर अस्ताव्यस्त झाल्यामुळे सेवागिरी महाराज ट्रस्ट व पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांना विनंती करण्यात आली.
या विनंतीनुसार अखंड समाजसेवेचे व्रत घेतले ल्या प्रतिष्ठान यांचे अंदाजे अठराशे सदस्य उपस्थित रहात अवघ्या दोन तासामध्ये सकाळी सात ते नऊ या कालावधीत उत्तम नियोजन व स्वयं शिस्त राबवत सात ते आठ किलोमीटर चा परिसर स्वच्छ करत 57 ट्रॉली कचरा जमा करण्याचा आला व त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात आली.
![]() |
त्यामुळे परिसर चकाचक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये सेवागिरी महाराज ट्रस्टचे आजी-माजी सदस्य ग्रामपंचायत पुसेगाव सदस्य ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ तसेच तरुण वर्ग यांनी यांनी उपस्थित रहात मदत कार्य करत प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले व मान्यवरांनी प्रतिष्ठानचे कौतुक करत अभियान यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन देखील केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / पुसेगाव (सातारा)





Post a Comment