गोरगरीब जनतेसाठी जिल्हा रुग्णालयातील ‘युनिक’ची MRI-CT स्कॅन योजना ठरतेय वरदान


सातारा : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिक वेलकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर जिल्हा रुग्णालय, सातारा येथे सुरू करण्यात आलेली एम.आर.आय. आणि सी.टी. स्कॅन सुविधा सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये एम.आर.आय. व सी.टी. स्कॅनसाठी मोठा खर्च येतो. मात्र, या योजनेमुळे जिल्हा रुग्णालयात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच अत्यल्प दरात या सुविधा उपलब्ध होत असल्याने आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना मोठा फायदा होत आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांचा अनुभव

जावली तालुक्यातील क्षेत्र कुसुंबी येथील श्री. जितिन वेंदे यांनी आपल्या आत्याच्या उपचारासाठी या सुविधेचा लाभ घेतला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराज साहेबांच्या प्रयत्नातून गोरगरीब व गरजू व्यक्तींना या योजनेचा मोठा लाभ मिळत आहे. मी माझ्या आत्याच्या उपचारासाठी गेलो होतो. त्यामुळे माझे हजारो रुपये वाचले. या उपकाराबद्दल कोणत्या शब्दांत आभार व्यक्त करावेत, हे मला समजत नाही. सर्व गोरगरीब जनतेने या योजनेचा लाभ घेऊन आपला अतिरिक्त खर्च वाचवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार-जावली विधानसभा तथा बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन यांचे विशेष प्रयत्न असल्याचे जितिन वेंदे यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील या सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना महत्त्वाच्या तपासण्या कमी खर्चात उपलब्ध होत असून, ही योजना सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्व नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, सातारा येथील एम.आर.आय. व सी.टी. स्कॅन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह | सातारा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने