सातारा : सातारा महाबळेश्वर महामार्गावर भणंग गावाजवळ माऊली हॉल परिसरात आज सकाळी दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत व्यक्तीचे नाव दीपक आनंदा कांबळे (रा. डांगरेघर) असे असून, ते केळघर येथून साताऱ्याकडे जात होते. त्याचवेळी साताऱ्यावरून महाबळेश्वरकडे जाणारी चारचाकी (क्र. MH 08 BE 8426) आणि दुचाकी (ॲक्टिवा, क्र. MH 11 DT 4011, पांढरा रंग) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीस्वार दीपक कांबळे हे धडक लागून गाडीच्या काचेला आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चारचाकी वाहन चालकाचे नाव प्रशांत मोरे (रा. कुंभारवाडा, खेड, जि. रत्नागिरी) असे असून, घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी सुधीर पाटील करत आहेत.
प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
न्यूज मराठी लाईव्ह | भनंग / जावली




टिप्पणी पोस्ट करा