कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सैदापूर ग्रामपंचायतीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. माधवी नाना पाठसुपे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी उपसरपंच अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य धनाजी राव जाधव, कुमार देसाई, हर्षद देसाई तसेच नाना पाठसुपे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार होण्याची गरज व्यक्त केली.
महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यात पुढे जाण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा