सातारा जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार

कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे


कराड: सातारा जिल्हा युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. प्रदेशाध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्षविस्तार यांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या बैठकीस अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तारीक बागवान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहप्रभारी शांभवी शुक्ला, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबणावे, सातारा जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी व प्रदेश सरचिटणीस भुषण रानभरे, जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रदेश सरचिटणीस प्राची ताकतोडे, अमित जाधव, प्रदेश सचिव सौरभ रुपणवार, विश्वजित जाधव, पंकज पोळ यांच्यासह सर्व जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात युवक काँग्रेस अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने