देवाच्या चिंतनाने जीवनाचे सार्थक होते –निलेश चव्हाण महाराज

प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी 


बिभवी (जावली) : येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. निलेश चव्हाण महाराज (मापरवाडी) यांची कीर्तन सेवा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

कीर्तनात बोलताना निलेश चव्हाण महाराज म्हणाले, “देवाच्या चिंतनाने देह सुफळ होईलच, पण अनेक जन्मांचेही सार्थक होईल.” त्यांनी रामजन्मानंतर हनुमंत रायाच्या जन्माचा संदर्भ देत देव आणि भक्त यांचे नाते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

महाराजांनी आपल्या प्रवचनातून भक्ती, नामस्मरण आणि चिंतन यांचे महत्त्व पटवून दिले. “भक्तांनी मनापासून देवाचे नामस्मरण आणि चिंतन केले, तर जीवनाचे खरे सार्थक होते,” असे ते म्हणाले.

या कीर्तन सेवेच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहाच्या पुढील दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने