प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मेढा : सातारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण केलेली जावळी तालुक्यातील जावळी करिअर अकॅडमी, मेढा ही संस्था आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्च महिन्यापासून नवीन बॅचेस सुरू होत असून या सुट्टीचा योग्य फायदा घ्यावा, असे आवाहन अकॅडमीचे प्रा. संतोष कदम यांनी केले आहे.
सन २०१३ मध्ये स्थापन झालेली जावळी तालुक्यातील पहिली करिअर अकॅडमी म्हणून या संस्थेची ओळख आहे. सलग बारा वर्षे अविरत सेवा देत असलेल्या या अकॅडमीमार्फत विविध भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. नुकत्याच लागलेल्या IBPS (बँकिंग), स्टाफ सिलेक्शन तसेच आर्मी-अग्निवीर परीक्षांच्या निकालात अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या अकॅडमीमध्ये एमपीएससी संयुक्त गट ब व गट क, सरळ सेवा लिपिक व टंकलेखक, बँकिंग (क्लर्क व प्रोबेशनरी ऑफिसर), यूजीसी-सेट, वन विभागातील विविध पदे, तलाठी, महसूल सहाय्यक, मंत्रालय क्लर्क, पीडब्ल्यूडी, जिल्हा न्यायालय, पोस्ट ऑफिस, शिक्षण सेवक, महाराष्ट्र पोलीस तसेच आर्मी, नेव्ही व स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. अनेक विद्यार्थी वर्ग दोन पदांपर्यंत मजल मारताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, प्रत्येक विषयासाठी अनुभवी व स्वतंत्र शिक्षक, शिकवलेल्या प्रत्येक घटकावर सराव परीक्षा, नियमित टेस्ट सिरीज, भरती डेमोचे आयोजन, बारा तासांची अद्ययावत एमपीएससी व पोलीस भरती अभ्यासिका, ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व्यवस्था ही अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
कॉलेज शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेसचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत अकॅडमी दरवर्षी आई-वडील नसलेल्या तीन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रमही राबवित आहे.
“शिस्तबद्ध व प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,” असा विश्वास अकॅडमीच्या संचालिका प्रा. राजेश्री कदम यांनी व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment