प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन ‘मिनी सरस जत्रे’चे उद्घाटन शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२६) उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद सातारा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध हस्तकला, खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने आदी वस्तूंनी सजलेल्या स्टॉल्सना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे हे कार्यक्रमासाठी येत असताना सैदापुर नगरीत त्यांचे सरपंच फत्तेसिंह भैय्या जाधव व धनाजीराव जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील (काका) बनवडी, सरपंच प्रदीप पाटील, पांडुरंग कोठावळे, रणवीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामुळे महिला स्वयंसहाय्यता समूहांना आर्थिक बळकटी मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच स्थानिक उत्पादनांना अधिक ओळख मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment