जावली पंचायत समितीचे सभापती मा.सौरभ बाबा शिंदे यांचा कुडाळ येथे सत्कार


कुडाळ (जावली) : जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मा. सौरभ बाबा शिंदे यांचा कुडाळ येथे सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच कुडाळ व पंचशील नगर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचशील नगरमधील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नवीन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच कुडाळचे अध्यक्ष आयु. मनोज कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जावलीचे उपाध्यक्ष आयु. प्रवीण कांबळे, आदर्श बौद्धाचार्य आयु. दशरथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जावलीचे कोषाध्यक्ष आयु. नारायण रोकडे, मंचाचे उपाध्यक्ष आयु. राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत कुडाळ सदस्य आयु. दत्तात्रय जाधव, बौद्धाचार्य आयु. करण कांबळे, आयु. प्रणव कांबळे, आयु. भीमराव कांबळे, आयु. उमेश कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुडाळचे सचिव आयु. अमर यादव आणि आयु. गणेश कांबळे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श बौद्धाचार्य आयु. दशरथ कांबळे यांनी मा. सौरभ शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरील पुस्तके भेट देऊन सत्कार केला.

न्यूज मराठी लाईव्ह 
कुडाळ / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने