कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी


बामणोली (सातारा) : जावली तालुक्यातील तेटली गावात कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


यावेळी जावली पंचायत समिती सदस्या मा. श्रीमती शकुंतला ताई सकपाळ यांना कोंडाई सामाजिक महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जावली पंचायत समितीचे उपसभापती व DMK जावली सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. शंकरराव साळुंखे (अण्णा) यांना कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक असे होते.

कार्यक्रमास कोयना विभागातील ४३ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. आनंद कदम (मुरडे), ३२ गाव समाज सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कोंडीराम महाराज कदम तसेच २२ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. हरिबा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रस्टतर्फे गरजू व्यक्तींना कीट वाटप करण्यात आले. तसेच “चला सयांनो संस्कृती जपू” या घोषवाक्याखाली जिजामाता महिला मंडळ तेटली आणि कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाला कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे, शांताराम (सरपंच, आपटी), गणेश भोसले (संचालक, DMK जावली सहकारी बँक), एकनाथ पाटील (सरपंच, केळघर- सोळशी), अंकुश शिंदे (अध्यक्ष, सावरी मंडळ), हरिभाऊ साळुंखे, विलास फाळके, भीमराव केंजळे (शाखा अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोरेगाव) यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. सूत्रसंचालन ट्रस्ट कार्याध्यक्ष प्रताप भोसले व सचिव प्रशांत भोसले यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. सौ. उज्वला भोसले-जाधव यांनी सादर केले. आभार प्रदर्शन ट्रस्ट उपाध्यक्ष प्रकाश भोसले यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर. डी. भोसले, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, कार्याध्यक्ष प्रताप भोसले, तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, जिजामाता महिला मंडळ तेटली, ग्रामस्थ मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई व श्री बाळसिद्धेश्वर प्रतिष्ठान तेटली यांनी विशेष परिश्रम घेतले.


न्यूज मराठी लाईव्ह 
बामनोली / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने