मेढा नगरपंचायत प्रभाग ८ मध्ये ‘नगरसेविका आपल्या दारी’ उपक्रमातून महिला दिन साजरा

प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी


मेढा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेढा नगरपंचायत प्रभाग क्र. ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे यांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवत महिला दिन साजरा केला. “नगरसेविका आपल्या दारी” ही संकल्पना राबवून प्रभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांसोबत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.


या उपक्रमादरम्यान प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला फळझाडाची भेट देण्यात आली. तसेच महिलांच्या आणि नागरिकांच्या समस्या, तसेच प्रभागातील विकासकामांबाबत सूचना जाणून घेण्यात आल्या. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागातील महिलांनी नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या जावली पंचायत समिती सदस्या सौ. शिल्पा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे, सुनिता पार्टे, अॅड. पुनम गोरे, छाया कदम, आशा नलवडे, नारायण शिंगटे, नारायण दळवी, सुरेश पार्टे, डॉ. मिलिंद शिंदे, प्रकाश कदम, रामचंद्र मोरे, राजेंद्र नलवडे, मोहन देशमुख, नितीन देशमुख, मंगेश पार्टे, सिद्धेश मोरे, सुनील गांगुर्डे आणि वरद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनिता मोरे, दुर्गा मोरे, शारदा पवार, कमल शिंगटे, अबोली पार्टे, विमल जाधव, तनवी मोरे आणि सिद्धी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी जावली पंचायत समितीच्या सदस्यपदी विजयी झाल्याबद्दल सौ. शिल्पा शिंदे यांचा प्रभागातील महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post