आर के मरीन करिअर अकॅडमीमध्ये जुलै २०२६ बॅचचा शुभारंभ

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे

कराड : येथील नामांकित आर के मरीन करिअर अकॅडमीमध्ये जुलै २०२६ बॅचच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शिवजयंतीदिनी नव्या बॅचचा शुभारंभ उत्साहात पार पडला. बी.टेक मरीन इंजिनिअरिंग (४ वर्षे), बी.एस्सी. नॉटिकल सायन्स (३ वर्षे) तसेच जी.पी. रेटिंग (६ महिने) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज अकॅडमीच्या राजनक्षत्र, कार्वे नाका, कल्याणी शाळेजवळील कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती संचालक राहुल कुमार खडके यांनी दिली.

अकॅडमीच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि शिवजयंतीचे औचित्य साधून बॅचचा शुभारंभ राहुल खडके यांचे वडील, निवृत्त नायब तहसीलदार विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते करण्यात आला. अकॅडमीची स्थापना १५ वर्षांपूर्वी वडूज येथे झाली असून २०११ पासून कराड येथे मुख्य शाखा कार्यरत आहे. गेल्या १५ वर्षांत अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली २००० हून अधिक कॅडेट्स विविध देशांमध्ये शिपिंग क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

भारतामध्ये सागरी प्रकल्प आणि बंदर विकासाला वेग आल्यामुळे शिपिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. मर्चंट नेव्हीमुळे जागतिक दळणवळण सुलभ होत असून या क्षेत्रात अभियंते, नेव्हिगेटर, ऑपरेटर, कूक आणि सीमेन यांना आकर्षक वेतनासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरची संधी उपलब्ध होत आहे.

मराठी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त करत संचालकांनी युवकांनी या धाडसी आणि प्रतिष्ठित क्षेत्रात करिअर घडवावे, असे आवाहन केले. महाराष्ट्रातील नौदल प्रशिक्षण केंद्र INS Shivaji तसेच मुंबईतील INS Angre ही केंद्रे मराठी आरमार परंपरेची साक्ष देतात, असेही त्यांनी नमूद केले.

अकॅडमीमध्ये दररोज मोफत करिअर मार्गदर्शन सुरू असून १७ ते २७ वयोगटातील, किमान ६० टक्के गुणांसह १०वी/१२वी उत्तीर्ण किंवा परीक्षेला बसलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी ९८२२४३५८५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post