प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : “ओम शांती” या ईश्वरीय संदेशाने प्रारंभ होत ब्रह्माकुमारीज् मसूर सेवा केंद्राचा १६ वा वर्धापन दिन तसेच ब्रह्माकुमारी परिवाराचा सन्मान सोहळा रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
आत्मविश्वास, शुभ भावना आणि सर्वोच्च शक्ती परमात्म्याशी मन जोडल्याने जीवन अधिक अर्थपूर्ण, मंगलमय व शांततामय होते, या आध्यात्मिक संदेशाचा प्रसार करत ब्रह्माकुमारीज् परिवार गेली अनेक वर्षे समाजहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्यरत आहे. विविध आध्यात्मिक शिबिरे, राजयोग ध्यान प्रशिक्षण व नैतिक मूल्यांची जपणूक यामधून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले जात आहे.
या कार्याची दखल घेत वर्धापन दिनानिमित्त ब्रह्माकुमारी परिवाराचा कृतज्ञतापूर्वक गौरव व सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी नलिनी बहनजी (मीरा सोसायटी, सेवा केंद्र संचालिका) यांचे आशीर्वचन लाभणार असून उपस्थितांना राजयोग व आध्यात्मिक जीवनमूल्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे.
हा कार्यक्रम मसूर येथील ‘शिवालय’, अष्टविनायक पेठ, दत्त मंदिराशेजारी, ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९६२३२ ७८१७६ व ८३०८९ ०६४९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या मंगलमय सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment