पुण्यात २६ फेब्रुवारीपासून ‘आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स २०२६’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन; गिअर उद्योगाला जागतिक चालना..!

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे

पुणे : गिअर आणि मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि जागतिक सहकार्याचा संगम घडविणारे ‘आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स २०२६’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन येत्या २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. गिअर मॅन्युफॅक्चरिंग, प्रिसीजन ग्राइंडिंग आणि पॉवर ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील हे भारतातील अग्रगण्य व्यासपीठ मानले जाते.

या प्रदर्शनाला American Gear Manufacturers Association यांचे पाठबळ लाभले असून आयोजनाची जबाबदारी Vergo Communications and Exhibitions Private Limited यांनी स्वीकारली आहे. उद्योग क्षेत्रातील नामवंत नेत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून देश-विदेशातील उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि इंडस्ट्री एक्स्पर्ट्स एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.

याबाबत माहिती देताना व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन्स प्रा. लि. चे संचालक रघुनाथ जी. यांनी सांगितले की, आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स २०२६ हे गिअर आणि पॉवर ट्रान्समिशन मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यापक व्यासपीठ आहे. गिअर कटिंग व ग्राइंडिंग मशिन्स, टूलिंग, मेट्रोलॉजी, फिनिशिंग, ऑटोमेशन आणि कंट्रोल सिस्टीम्सपर्यंत उद्योगाचे ३६० अंश दृश्य येथे अनुभवता येणार आहे.

प्रॉडक्ट प्रेझेंटेशन्स, लाईव्ह डेमो, टेक्निकल सेमिनार्स आणि बिझनेस फोरम्सच्या माध्यमातून डिझाइनर्स, ओईएम्स, कॉम्पोनंट उत्पादक आणि एंड-यूजर्स यांच्यात थेट संवाद साधला जाणार आहे. भारतासह अमेरिका, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या औद्योगिक देशांतील कंपन्यांचा सहभाग अपेक्षित असून जागतिक मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन इकोसिस्टममध्ये भारताचे वाढते धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होणार आहे.

APAR Industries Limited, Burri India Private Limited, EMAG India Private Limited, Liebherr Machine Tools India Private Limited, Mitutoyo South Asia Private Limited, PMT Machines Limited, Tyrolit India, Superabrasives Tools Private Limited आणि UCAM Private Limited यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांची उपस्थिती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

ईव्ही ड्राइव्हट्रेन, स्मार्ट फॅक्टरी, डिफेन्स सिस्टीम्स, रिन्युएबल एनर्जी आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन ही यंदाच्या प्रदर्शनाची प्रमुख फोकस क्षेत्रे असतील. इंडस्ट्री ४.०, रिअल-टाईम मॉनिटरिंग, एआय-आधारित इन्स्पेक्शन, अॅडव्हान्स्ड मेट्रोलॉजी, प्रिसीजन सरफेस इंजिनिअरिंग आणि लोकलायझेशन यांसारख्या नव्या ट्रेंड्सवर विशेष भर देण्यात येणार आहे.

‘गिअर टेक्नॉलॉजी इंडिया समिट २०२६’ अंतर्गत “ग्लोबल ऑपर्च्युनिटीज इन गिअर अँड पॉवरट्रेन मॅन्युफॅक्चरिंग : डिफेन्स, ईव्ही अँड बियॉण्ड” या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. तसेच ‘गिअर टेक्नॉलॉजी इंडिया अवॉर्ड्स २०२६’मध्ये डिझाइन, इनोव्हेशन, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स, हीट ट्रीटमेंट, इंडिजिनायझेशन, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, वुमन लीडरशिप आणि लाइफटाईम अचिव्हमेंट अशा विविध गटांमध्ये उत्कृष्टतेचा गौरव करण्यात येणार आहे.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन भारतीय मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला नवी गती देणारे ठरणार आहे. ऑटोमोबाईल, डिफेन्स, रेल्वे, एअरोस्पेस आणि ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या गिअर व मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन उद्योगाला नवे बळ देत ‘आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स २०२६’ हे पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
पुणे

Post a Comment

Previous Post Next Post