प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मुंबई : मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टाटा समूहाचे प्रमुख मा. नोवेल जी टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात आज ऐतिहासिक असा सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला.
हा करार राज्यातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अधिक , पारदर्शक आणि जलद वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शासन आणि उद्योग क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी यांचा हा उत्तम समन्वय असून, समाजहिताच्या दृष्टीने हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आहे.
यावेळी महराष्ट्राचे आदरणिय मा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय मा जयकुमार गोरेजी, मा संजय राठोडजी, मा आदिती तटकरे मॅडम, मेघना बोर्डिकर मॅडम, पाणी फाऊंडेशनचे अभिनेते मा. नाना पाटेकरजी मा मकरंद अनासपुरेजी, मा उदय निरगुडकरजी महाराष्ट्र राज्याचे मा मुख्य सचिव राजेश अगरवाल सर अमुस मा भिडे मॅडम, प्रधान सचिव,डॉ श्रीकर परदेशी सर सोबत प्रधान सचिव,सचिव अधिकारी कर्मचारी व टाटा परिवार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मा. रामेश्वरजी नाईक, मा.देवानंद धनावडे सहायक संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
मुंबई

टिप्पणी पोस्ट करा