फलटण शहरात बौद्ध समाजाचा वधू–वर परिचय स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


फलटण : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तनिष्का वधू–वर सूचक संस्था, जावली यांच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, फलटण तालुका यांच्या विशेष सहकार्याने बौद्ध समाजाचा वधू–वर परिचय स्नेहमेळावा फलटण येथे यशस्वीपणे पार पडला.


या मेळाव्यात फलटणसह अमरावती, अहमदनगर, सांगली, पुणे व सोलापूर येथील अनेक युवक–युवतींनी सहभाग नोंदवला. मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जावली तालुका अध्यक्ष व तनिष्का वधू–वर संस्थेचे मार्गदर्शक मा. एकनाथ रोकडे साहेब, फलटण तालुका नगरसेविका सौ. सुवर्णाताई अहिवळे व नगरसेविका सौ. मीना ताई काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय निकालजे (आर.पी.आय. फलटण पदाधिकारी), मा. लक्ष्मण अहिवळे (फलटण तालुका अध्यक्ष, आर.पी.आय.), मा. अ‍ॅड. शितल अहिवळे, मा. तेजस काकडे (फलटण शहर उपाध्यक्ष, आर.पी.आय.), निर्मलाताई काकडे (आर.पी.आय. महिला अध्यक्ष), आशा काकडे (तालुका उपाध्यक्ष, महिला) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीत मा. शिवाजीराव सावंत, मा. दत्ता अहिवळे व मा. कुमार सुर्वे (भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष) यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे विधी संकलन मा. संतोष खरात (भारतीय बौद्ध महासभा, जावली अध्यक्ष) यांनी केले, तर सूत्रसंचालन मा. दशरथ कांबळे (भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा महासचिव) यांनी केले. या मेळाव्यासाठी आयु. प्रमोद मोतलिंग, करण कांबळे, शर्मिला कांबळे, तनिष्का कांबळे व प्रणव कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या प्रसंगी युवक–युवती व पालकांना मार्गदर्शन करताना मा. एकनाथ रोकडे यांनी तनिष्का वधू–वर सूचक संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रभर निःस्वार्थ भावनेने विवाह जुळवण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. सध्याच्या काळात सर्व जिल्ह्यांत अशा प्रकारचे वधू–वर मेळावे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे मत सौ. निर्मलाताई भोसले यांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन करताना दशरथ कांबळे यांनी सांगितले की, समाजात विवाह जुळवणे सध्या अवघड झाले असून योग्य वयात विवाह न झाल्यास अडचणी निर्माण होतात. केवळ व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष मेळाव्यांतून युवक–युवती एकत्र आल्यास योग्य स्थळ मिळण्यास मदत होते.

यावेळी लवकरच मुंबई येथे बौद्ध समाजाचा वधू–वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. समाजातील सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

न्यूज मराठी लाईव्ह 
फलटण / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post