प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : दि.26 शहरात साईभक्तांचा पारंपरिक पालखी सोहळा अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या साईंच्या भंडारा (स्नेहभोजन) कार्यक्रमाला भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. साईभक्त पालखी सोहळा व जयंत गुजर मित्र परिवाराच्या वतीने नगराध्यक्ष यादव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष यादव यांनी साईंच्या चरणी नतमस्तक होत कराड शहरातील सर्व नागरिकांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, बंधुता व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
साईंच्या भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व भक्तीभावात उत्साहाने संपन्न झाला.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment