अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे 

कराड : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी येवती (ता. कराड) येथील सुपुत्र तथा दैनिक ललकारचे कराड विशेष प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय संघटक व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

ज्ञानेश्वर शेवाळे यांनी यापूर्वी सातारा जिल्हाध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदांवर कार्य करताना संघटनेची बांधणी भक्कम केली आहे. सातारा जिल्ह्यात ग्रामीण पत्रकारांना संघटित करून त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि ते प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या कार्यतत्परतेची आणि संघटन कौशल्याची दखल घेत संघटनेने त्यांना पदोन्नती देत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल (बाबा) भोसले, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, सातारा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तसेच कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या या निवडीमुळे कराड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक बळ मिळणार असल्याची भावना पत्रकार व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post