चोरांबे गावच्या सौ.सुषमा तुषार सपकाळ यांना नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी

प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी

चोरांबे (ता.जावली) : वेद अकॅडमी च्या शिक्षिका, चोरांबे गावच्या रहिवाशी, चोरांबे गावचे पोलीस पाटील श्री.तुषार सपकाळ यांच्या धर्मपत्नी सौ. सुषमा तुषार सपकाळ यांनी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे “सुपर कॅपेसिटर आणि वॉटर स्प्लिटिंग” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.

सौ. सुषमा सपकाळ यांनी आपल्या संशोधनात ऊर्जा साठवण आणि जलविभाजन या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल अभ्यास करून प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या संशोधन परीक्षामंडळाने त्यांच्या प्रबंधास मान्यता देत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. सरफराज मुजावर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांकडून तसेच वेद अकॅडमी मेढा चे सर्व शिक्षक वृंद यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सौ. सुषमा सपकाळ यांचे हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
 
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे त्यांचे पती श्री.तुषार सपकाळ यांनी दिलेली अनमोल साथ या जोरावरच यश संपादन करू शकले असे मत सौ.सुषमा सपकाळ यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल संपूर्ण जावली तालुक्यातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post