प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, या प्रक्रियेत नगरसेवक मा. नरेंद्र लिबे यांची अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्रीडा समिती तसेच पाणी नियोजन समितीवर सदस्य म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे.
शहरातील क्रीडापटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, खेळासाठी आवश्यक पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करणे तसेच युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देणे, या दृष्टीने क्रीडा समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे कराड शहराचा वाढता पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रभावी नियोजन व ठोस निर्णय घेण्याची जबाबदारी पाणी नियोजन समितीवर आहे. त्यामुळे या दोन्ही समित्यांवरील मा. नरेंद्र लिबे यांची निवड शहरहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मा. नरेंद्र लिबे यांचा व्यापक जनसंपर्क, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग तसेच क्रीडा क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सहभागामुळे पालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून मा. नरेंद्र लिबे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक व लोकहिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment