प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
केळघर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच आंबेघर–मेढा गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केळघर गावचे सुपुत्र व माजी सरपंच रविंद्र सल्लक यांना आंबेघर–मेढा गणातून उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांसह विभागातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
माजी सरपंच रविंद्र सल्लक यांनी आपल्या कार्यकाळात ना. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबा महाराज) व विभागाचे नेते ज्ञानदेव रांजणे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. पिण्याच्या पाण्याच्या योजना, गावांतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून योजना पूर्ववत सुरू करणे आदी लोकाभिमुख कामांमुळे त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरोघरी कीटकनाशक फवारणी, जनजागृती, नागरिकांना धीर देण्याचे कार्य केले. त्या काळात पंचायत समिती जावळी, तहसील कार्यालय जावळी तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले.
सरपंचांच्या सन्मान व हक्कांसाठी सरपंच संघटना उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शासनाच्या निर्णयांविरोधात कंदील मोर्चा काढून आंदोलन करत स्टेट लाईन वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यश मिळवले. या कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनिवडीत सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून ते आजही संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत.
आंबेघर–मेढा गणातील प्रत्येक गावात तसेच घराघरात त्यांची ओळख असल्याने निवडणुकीत याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आंबेघर–मेढा गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) आरक्षित असून, या गणातून संधी द्यावी अशी मागणी ना. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबा महाराज) व नेते ज्ञानदेव रांजणे यांच्याकडे करण्यात येत आहे.
याशिवाय केळघर परिसरात गणपती व दुर्गा देवी मूर्तिकार म्हणूनही रविंद्र सल्लक परिचित आहेत. केळघर बाजारपेठ गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालयांची व्यवस्था, जय दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना मदत, रक्तदान शिबिरे, तसेच धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
सर्वांगीण विकासाचा अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक ताकद असलेल्या या कार्यकर्त्याला आंबेघर–मेढा गणातून उमेदवारी द्यावी, अशी केळघर व परिसरातील जनतेची एकमुखी मागणी आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
केळघर / जावली

Post a Comment