कराडमध्ये कोकणवासीयांकडून नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र लिबे यांचा भव्य सत्कार

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे


कराड : कराड शहरातील सर्व कोकणवासीयांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र लिबे यांचा आज मोठ्या उत्साहात स्वागत व भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे कोकण समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या सत्कार समारंभाला कोकण समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलहार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन नरेंद्र लिबे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, कराड शहराच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना नगरसेवक नरेंद्र लिबे म्हणाले, “कोकणवासीयांनी दाखवलेला हा विश्वास व प्रेम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने विकासकामे करण्याचा माझा प्रयत्न राहील.” कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामुळे कोकण समाजातील एकजूट, सामाजिक सलोखा व परस्पर सहकार्य अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post