प्रतिनिधी | बजरंग चौधरी


मेढा : जावली तालुक्यातील जवळवाडी येथील भैरवनाथ तरुण मंडळ जवळवाडीचे सभासद ज्ञानदेव किसन जवळ यांचे चिरंजीव व गावाचे सुपुत्र कु. प्रसाद ज्ञानदेव जवळ यांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर (टेक्निकल) पदासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रसाद यांनी हे यश संपादन केले आहे. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. सध्या ते आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत.

त्यांचे हे यश निश्चितच आदर्शवत व कौतुकास्पद असून, गावातील इतर युवकांना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामस्थांनी विशेष आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

प्रसाद जवळ यांना पुढील प्रशिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


न्यूज मराठी लाईव्ह 

मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post