बातमी : श्री.विलास दरेकर
हुमगाव (जावली) : हुमगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री हुमगाव येथील श्री. हरीश वाघमारे यांच्या घराच्या मागील बाजूस बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.
तसेच, परवाच्या दिवशी हुमगावच्या शेत परिसरातील महांगडे वस्ती येथे श्री. रामचंद्र महांगडे यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याचे त्यांनी स्वतः पाहिले असल्याची माहिती दिली आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर हुमगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा परिसरात फिरताना विशेष काळजी घ्यावी, लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. वनविभागानेही तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
हुमगाव / जावली


Post a Comment