प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे
ठाणे : वंचितांच्या आवाजाला व्यासपीठ देणारी एक प्रभावी चळवळ म्हणजे वंचितांचा रंगमंच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध रंगकर्मी सुप्रिया मतकरी विनोद यांनी केले. वंचित युवांच्या मनातील स्पंदनांचा हुंकार या मंचातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोष मोठ्या उत्साहात साजरा झाला. समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून यंदा ‘बदलते शहर’ या विषयावर ठाणे व परिसरातील वस्त्यांमधील मुलांनी अर्थपूर्ण नाटिका सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा बोरकर यांनी केले, तर संस्थापक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सोनाली लोहार, मकरंद जोशी, प्रताप प्रजापती, नरेंद्र बेडेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नाटिकांमधील उत्कृष्ट अभिनय, लेखन व सादरीकरणासाठी निवडक बालकलाकारांना सुप्रिया मतकरी विनोद यांच्या हस्ते विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
न्युज मराठी लाईव्ह
ठाणे / मुंबई

Post a Comment