बातमी : श्री.विलास दरेकर
मेढा : संवेदनशील काव्यलेखनातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, तसेच प्रभावी प्रवासवर्णनातून वाचकांना प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव देणारे कवी, लेखक व उत्कृष्ट कलाकार मेढ्याचे सुपुत्र कवी नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे यांची दिनांक १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान सातारा येथे आयोजित होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील प्रमुख आकर्षण असलेल्या ‘कविकट्ट्या’ साठी जावली तालुक्यातून निवड झाली आहे.
आपल्या सशक्त शब्दसामर्थ्याने, सामाजिक जाणिवेने आणि भावनांच्या सूक्ष्म अभिव्यक्तीने त्यांनी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कवितांमधील संवेदनशीलता व प्रवासवर्णनातील जिवंत शैलीमुळे वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे.
या मानाच्या निवडीमुळे जावली तालुका व मेढा गावाच्या साहित्यिक परंपरेचा गौरव झाला असून, साहित्यप्रेमी नागरिक, कवी-लेखक तसेच विविध संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कवी नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment