जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी; शाळेत स्पोर्टस् ड्रेसचे वाटप

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


मेढा (जावली) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडीचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय यश संपादित करीत असल्यामुळे पालक व ग्रामस्थांचा शाळेकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला असून शाळेला मदत करण्यासाठी अनेक ग्रामस्थ पुढे येत आहेत.

       आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी या ठिकाणी गवडी गावाचे माजी उपसरपंच आनंदा विष्णू पवार यांचे सौजन्याने सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्टस् ड्रेस वाटप करण्यात आले. या शुभप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश गोळे व सदस्य विकास धनावडे, गावचे पोलिस पाटील रविंद्र चव्हाण, ग्रामस्थ शांताराम जांभळे,दत्तात्रय जांभळे,प्रसाद धनावडे,अजित सपकाळ, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन धनावडे, शाळेला वेळोवेळी मदत करणारे गणेश धनावडे, लहुजी सेना अध्यक्ष व पत्रकार मोहन खुडे, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व शुभेच्छा दिल्या.

      आनंदा विष्णू पवार यांचे जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षणविस्तार अधिकारी मिलन मुळे, केंद्रप्रमुख वंदना गंगावणे,शाळा व्यवस्थापन समिती गवडी, श्री.चवणेश्वर प्रतिष्ठाण मंडळ गवडी व ग्रामस्थ मंडळ गवडी यांच्यावतीने खूप खूप आभार व धन्यवाद


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post