शाहिरी पोवाडा स्पर्धेत एकीव शाळा प्रथम

प्रतिनिधी / श्री.बजरंग चौधरी

मेढा : सायगाव (ता.जावली) येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेत लहान गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकीव (ता.जावली) येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी “बाजीप्रभूंचा पराक्रम” हा शाहिरी पोवाडा प्रभावीपणे सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि प्रथम क्रमांक पटकावला. 

या उत्कृष्ट सादरीकरणामुळे एकीव शाळेची ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय शाहिरी पोवाडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पोवाड्याच्या तयारीसाठी शिक्षक श्री. सुरेश सपकाळ, सौ. पूजा प्रभुणे, सौ. नंदा कोकरे तसेच मुख्याध्यापक श्री. प्रकाश धनावडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

या यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कर्णे, श्री. मिलन मुळे, श्री. उमेश मोरे, श्री. मणेर, केंद्रप्रमुख श्री. दत्तात्रय बाचल, श्री. हंबीरराव जगताप, श्री. सुभाष दृटाळ तसेच सौ. वंदना गंगावणे यांनी यशस्वी कलाकार विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने