बातमी | एच.बी.धनावडे
मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, युनिट दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., मुंबई यांच्या वतीने संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तेरणा ऑडिटोरियम, सेक्टर २२, नेरूळ (पश्चिम) येथे संपन्न होणार आहे.
या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, परमपूज्य दत्तात्रय महाराज आणि सन्माननीय आनंदराव अडसूळ साहेब यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचे सादरीकरण, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय हास्यसम्राट व विनोदी कलाकार श्री. जॉनी रावत यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि समाजप्रबोधनकार तसेच प्रसिद्ध व्याख्याते, सातारा पोलीस दलातील अधिकारी श्री. भरत जाधव यांचे प्रेरणादायी व्याख्यान हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून परस्परांमधील स्नेह, आपुलकी, एकोपा आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. दैनंदिन कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सर्वांना एकत्र येण्याची आणि आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
या मेळाव्यास को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. श्री. आनंदरावजी अडसूळ साहेब, कार्याध्यक्ष श्री. सुनील साळवी साहेब, सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत साहेब, तसेच मध्यवर्ती कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच बँकेचे अध्यक्ष श्री. विक्रमजी भिलारे साहेब, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी (आबा) साहेब, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लालवानी साहेब, सरव्यवस्थापक श्री. जी. के. जाधव साहेब, उपसरव्यवस्थापक श्री. अनिल सणस साहेब व श्री. खोत साहेब, सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. संजय सकपाळ साहेब, श्री. सुधाकर दळवी साहेब आणि श्री. संतोष वैद्य साहेब यांच्यासह संस्थेतील कर्मचारी व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. संस्थेतील परस्परांचे संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच कौटुंबिक जिव्हाळा वाढविणे आणि बँकेच्या इतिहासाची माहिती कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे, हेही या मेळाव्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
बँकेचे संस्थापक, सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कळंबे, सातारा जिल्ह्यातील थोर शेतकरी व स्वातंत्र्यसेनानी भिलारे गुरुजी बाबा, तसेच बँकेचे भाग्यविधाते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा. श्री. आनंदराव अडसूळ साहेब यांच्या कार्याची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, युनिट दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | मुंबई
