नागठाणे येथील ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा दीदी यांना “देश रत्न” राष्ट्रीय पुरस्कार

प्रतिनिधी / अनिल मोरे

कराड : नागठाणे येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा दीदी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “देश रत्न” राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा २३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथील भारत मंडपम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

देश रत्न पुरस्कार हा एक सरकारी मान्यता प्राप्त राष्ट्रीय पुरस्कार असून त्याचे आयोजन भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन (BYWA) यांच्या वतीने करण्यात येते. हा प्रतिष्ठित पुरस्कार माजी पंतप्रधान व “भारतरत्न” चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. कार्यक्रमास श्रम व रोजगार मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचे सहकार्य लाभले होते.

सामाजिक सेवा, कृषी, संरक्षण, कला-संस्कृती, शिक्षण व जनकल्याण अशा विविध क्षेत्रांमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो. यामध्ये नागठाणे येथील ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा दीदी यांची सामाजिक सेवेसाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार माननीय श्री. रघुराज सिंह, श्रम व रोजगार मंत्री, उत्तर प्रदेश सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री मुस्तफा मुन (सोशालिस्ट) तसेच चौधरी नॅशनल को-इन्चार्ज, भाजप हे मान्यवर उपस्थित होते.

या राष्ट्रीय सन्मानामुळे नागठाणे परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून डॉ. सुवर्णा दीदी यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post