दिल्लीत पुरस्काराचे वितरण संपन्न, दादासाहेब काळे यांना उत्कृष्ट सरपंच पुरस्कार...!

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / माण (सातारा)


माण : बिजवडी - आंधळी ता.माण गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण उत्कृष्ट सरपंच २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील डॉ.विशाखा सोशल वेलफेअर टीम झेनिथ राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त महासंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


सरपंच दादासाहेब काळे यांनी आपल्या सरपंच कारकिर्दीत गावात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन त्यांना दि.९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अतिथी म्हणून माण तालुक्यातील आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे यांना निमंत्रित करण्यात आले होते.


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांम धील सरपंच दादासाहेब काळे यांनी विविध उपक्रम राबवत आदर्श व उपक्रमशील ग्रामपंचायत बनवली आहे.आंधळी गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. म्हणून गावामध्ये पाणीपुरवठा योजना करून पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली.गावामध्ये छोटा मोठा विकास करत असताना निर्मल ग्रामसमृद्धी योजनेमध्ये सहभागी होऊन २०१० साली आंधळी गाव निर्मल ग्राम केले. 

आ.जयकुमार गोरे व मा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे यांनी वेळोवेळी मोलाची साथ दिली.त्यामुळे गावातील विविध प्रश्न सोडवण्यात यश आले.या सर्वांच्या मदतीने आंधळी गावचा चौफेर विकास साधण्यात त्यांना यश आले आहे. गावामध्ये काँक्रीट रस्ते, गटारे, सभामंडप,पेव्हर ब्लॉक अशा स्वरूपाची कामे केली.त्याच बरोबर गोरगरीब जनतेला घरकुल योजनेतून घरे देण्याची महत्वपूर्ण कामे केली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध फंडातून गावाचा सर्वांगीण विकास केला.आंधळी गावामध्ये जि. प. फंडातून ग्रामपंचायतचे सुसज्ज असे कार्यालय उभारले. त्याचबरोबर आंधळी गावामध्ये वैकुंठधाम उभारले. आंधळी गावात हाय मास्ट पोलची उभारणी करून सर्वत्र प्रकाश उजळवला.युवकांसाठी जिम, विधवा महिलांना झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, डंक, पिठाच्या गिरणी पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतात.

शेतकरी बांधवांसाठी तीन दिवसांचे कृषी पर्यटनाचे आयोजन करून शेतकऱ्यांना शेती विषयक ज्ञान,पिकांचे संगोपन, शेळीपालन,गाय पालन तसेच इतर विविध नवीन योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी तीन दिवसीय कृषी पर्यटनाचे आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत आहेत. तसेच बचत गटातील महिलांनाही छोटे मोठे लघु उद्योग व्यवसाय मार्गदर्शनासाठी लघुउद्योगांना भेटीचे नियोजन करतात. 

आंधळी गावात बाजार सुरू करून गावातील महिलांची सोय तसेच शेतकऱ्यांना गावात बाजार पेठ उपलब्ध करून दिली. दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक आहेच पण तो मुख्य व्यवसाय म्हणून केला तरी त्यातून चांगला उदरनिर्वाह होऊ शकतो हे त्यांनी स्व अनुभवातून शेतकऱ्यांना दाखवून दैत दुग्ध व्यवसायाला चालना दिली.प्रेम फाउंडेशन च्या माध्यमातून आंधळी सह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये स्पर्धा,रक्तदान शिबिर, सर्व रोग निदान, नेत्र चिकित्सा शिबिर यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची सेवा सुरू ठेवली आहे.

दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून आंधळी गावातील पुढची पिढी सजग,सक्षम व सज्ञान बनविण्याच्या दृष्टीने गावातील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी 'विना दफ्तर शाळा' हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायती तर्फे जागर ग्राम विकासाचा या उपक्रमातंर्गत सलग दुसऱ्या वर्षी घरपट्टी व पाणी पट्टी वेळेवर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून व ग्रा.पं.सदस्य,ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य लकी ड्रॉ.बक्षीस योजना राबवली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे,माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर,माजी जि.प.सदस्य अर्जुन तात्या काळे,ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / माण (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post