मेहमूद्दीन शेख
प्रतिनिधी / रहिमतपूर (सातारा)
रहिमतपूर (सातारा) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रहिमतपूर यांचा अभिनव कार्यक्रम व पर्यावरण पूरक होळी करण्याचे आव्हान. होळीनिमित्त ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्यकर्ते यांनी होळी लहान करा व पोळी दान करा असे आव्हान करून बॉक्समध्ये पोळ्या जमा केल्या जवळपास 600 ते 700 पोळ्या गोळा झाल्या.
ह्या जमवलेल्या साऱ्या पोळ्या गरजू लोकांना वाटप करण्यात आल्या जवळजवळ बारा वर्षे हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रहिमतपूर यांच्यातर्फे राबवला जातो समितीचे सदस्य मोहसीन शेख प्रबोधन करताना म्हणाले होळी ही पर्यावरण पूरक साजरी केली पाहिजे झाडांची वृक्षतोड करून होळी करण्यापेक्षा शेजारचा कचरा गोळा करून पेटवून ही होळी साजरी केली तर दोन फायदे एक आपला परिसर स्वच्छ राहील व आपला सण ही साजरा करण्याचा हेतू साध्य होईल व पोळी आगीत जाऊन राख होण्यापेक्षा ती एखाद्या गरजूच्या मुखात गेल्यास त्याच्या चेहऱ्यावर हसू व भूक भागवण्याची सत्कार्य आपल्या हातून होईल व त्याच्या आत्म्याची दुवा आपल्याला लागेल.
या कामात हिरीरीने नायरा माने इयत्ता चौथी मध्ये शिकणारी हिचा सहभाग होता जवळजवळ बारा वर्षे हे काम आमची समिती करत आहे व लोकांचा उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे असे मधुकर माने सर म्हणाले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी शिंदे ,शंकर कणसे, प्रवीण माने, नायरा माने ,भगवान माने ,मधुकर माने सर ,नाना राऊत सर ,युवा नेते गणेश वासुदेव माने, व जाकीर आतार या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / रहिमतपूर (सातारा)




Post a Comment