सलग बाराव्या वर्षी जावळीला सर्वसाधारण विजेतेपद, यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत कायम दबदबा

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली) 


मेढा (सातारा) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आयोजित केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत सर्वाधिक बक्षीसे मिळवून जावळी तालुक्याने सलग बाराव्या वर्षी जिल्ह्याचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवत सलग यशाची परंपरा कायम राखली आहे. 
नुकताच कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते विजयाचा मानाचा करंडक आणि प्रशस्तीपत्र देऊन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ आणि सहकाऱ्यांने गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, जिल्हा शिक्षण अधिकारी शबनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील येणारे प्रत्येक आव्हान पेलत व स्विकारत जावली तालुका विशेष प्रयत्नांनी स्वतःला समर्पित करत यश मिळवत असतो. यावर्षी झालेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध स्पर्धा
यामध्ये पोवाडा गायन स्पर्धेत लहान गटात एकीव तर मोठ्या गटात ओझरे शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात भोगवली शाळेच्या चेतन गोळे तृतीय तर मोठ्या गटात कुडाळ शाळेच्या राजवीर शिंदे ने प्रथम क्रमांक मिळविला.

निबंध स्पर्धेत लहान गटात कुडाळ शाळेच्या नेहा मोहिते हिने द्वितीय तर मोठ्या गटात महीगाव शाळेच्या अहिल्या जगताप हिने द्वितीय क्रमांक पटकावला. हस्ताक्षर स्पर्धेत लहान गटात मेढा शाळेचा हर्ष पालांडे तर मोठ्या गटात आलेवाडी शाळेच्या वेदांत बिरामणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत आलेवाडी शाळेने जिल्ह्यात यश मिळवले. लोकनृत्य स्पर्धेत कुडाळ शाळा जिल्ह्यात प्रथम आली तर हस्तलिखित स्पर्धेत आलेवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. बालनाट्य स्पर्धेत ओझरे शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. 

सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यात जावळीचा वरचष्मा राहिल्याने जावळीला यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप देण्यात आली. या यशासाठी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, अरविंद दळवी, केंद्रप्रमुख मिलन मुळे, आर.टी.दळवी, वंदना गंगावणे, हंबीरराव जगताप, बळवंत पाडळे, उस्मान मणेर, एस.जी.धनावडे, सुभाष दुटाळ, शंकर बिरामणे आदींनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post