सातारा : बौद्ध समाजातील मुला–मुलींना योग्य जोडीदार मिळण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा राज्यस्तरीय वधू–वर परिचय मेळावा शनिवार, 28 डिसेंबर रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात इच्छुक वधू–वरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या मेळाव्यात डॉक्टर, वकील, अभियंते, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, खासगी नोकरीतील युवक–युवती, शेतकरी तसेच अविवाहित, विधुर व घटस्फोटीत अशा विविध पार्श्वभूमीतील स्थळे उपलब्ध असणार आहेत. अनेक योग्य विवाह जुळून येत असल्याने इच्छुकांनी आजच नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
विशेष म्हणजे 10 वी व 12 वी (13 वी) शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, अशा स्थळांसाठी मेळाव्यात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र मुलींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा अध्यक्ष आयु. कुमार सुर्वे यांनी केले आहे.
तसेच सातारा जिल्हा बौद्ध वधू फेडरेशनचे अध्यक्ष आयु. गौतम माने यांनी सांगितले की, मेळाव्यात मुली व मुले प्रत्यक्ष उपस्थित असतील तरच प्रवेश दिला जाईल. मेळाव्याची फी धम्मदान स्वरूपात नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा मेळावा राज्यस्तरीय असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
आयोजक : सातारा जिल्हा बौद्ध वधू–वर फेडरेशन, सातारा
संयोजक : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा
विशेष सहकार्य : तनिष्का वधू–वर सूचक संस्था, जावली
संपर्क : आयु. दशरथ कांबळे
मोबाईल : 8806374191

Post a Comment