सातारा : बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध वधू-वर परिचय मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. 28 डिसेंबर 2025, रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, सातारा येथे भव्यदिव्य पद्धतीने भरविण्यात येणार आहे.
मेळाव्यात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, तसेच घटस्फोटीत व विधुरांसाठी अनेक उत्तम स्थळांची उपलब्धता करून देण्यात येणार असल्यामुळे समाजातील सर्व घटकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून
मा. एकनाथ रोकडे साहेब (भारतीय बौद्ध महासभा – संस्कार उपाध्यक्ष)
मा. कुमार सुर्वे (भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अध्यक्ष)
उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा बौद्ध वधू-वर फेडरेशन यांनी घेतली आहे.
संपर्क क्रमांक —
📞 मा. गौतम माने : 8459285255
📞 मा. दशरथ कांबळे : 8806374191
📞 मा. अर्जुन वीर : 9922408064
या परिचय मेळाव्यामुळे समाजातील अनेक तरुण-तरुणींना योग्य जोडीदार शोधण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार असून, कार्यक्रमाबद्दल समाजात उत्सुकता पाहायला मिळत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

टिप्पणी पोस्ट करा