कुडाळ (जावली) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्यक बुद्धविहार, पंचशील नगर येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे विधी संकलन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा महासचिव आयु. दशरथ कांबळे यांनी केले.
त्यानंतर श्रामनेर बौद्धाचार्य आयु. करण कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयु. उत्तम देवकर यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा सर्वांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर :
आयु. संदीप कांबळे, आयु. निलेश कांबळे, आयु. राजेंद्र जगताप, आयु. बजरंग खंकाळ, आयु. संतोष कांबळे, आयु. विनोद गायकवाड, आयु. भानुदास कांबळे, आयु. वसंत गायकवाड, आयु. प्रशांत शिंदे, आयु. पाटील, आयु. मोहन जगताप, तसेच उपासिका मंगल कांबळे, जयश्री कांबळे, मंगल शिंदे आदी मान्यवरांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांमध्ये सरणते घेण्यात आली आणि कार्यक्रम शांततेत संपन्न झाला.
न्यूज मराठी लाईव्ह
कुडाळ / जावली


Post a Comment