प्रतिनिधी / श्री.बजरंग चौधरी
कुसुंबी (जावली) : दि. ५ जावली तालुक्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर घालणारा क्षेत्र कुसुंबीची काळुबाई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. ज्ञानदेव रांजणे (संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा) व ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबीचे सरपंच श्री. मारुती (बापू) चिकणे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या विचारमंचावर देवस्थानचे अध्यक्ष किसनराव चिकणे, उपाध्यक्ष विजय वेंदे, माजी अध्यक्ष रामदास वेंदे, उपसरपंच निवृत्ती मोरे, माजी उपसरपंच जगन्नाथ चिकणे, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव चिकणे, दत्तात्रय चिकणे (गुरुजी), मेढा सेंटर सेवा सोसायटीचे संचालक गणपत गोरे, उद्योजक सोपान चिकणे, समाजसेवक चंद्रकांतजी वेंदे, पुजारी जनार्दन गुरव, अजय कुंभार, तसेच फोटोग्राफर महेश वेंदे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दिनदर्शिकेमुळे जनमानसापर्यंत मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती पोहोचत असल्याचे सांगत सरपंच मारुती चिकणे यांनी सर्व संचालक व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. देवस्थानचे सचिव संतोष चिकणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, दिनदर्शिकेद्वारे भाविकांना संपूर्ण वार्षिक नियोजन व वेळापत्रकाची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात श्री क्षेत्र कुसुंबीचा नावलौकिक अधिक व्यापक करण्यासाठी देवस्थान कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच २०२७ सालाकरिता नवीन दिनदर्शिका भाविकांच्या सेवेत सादर करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या सोहळ्यास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, युवक-युवती, नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीकांत चिकणे यांनी केले, तर विश्वस्त ज्ञानेश्वर चिकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
न्यूज मराठी लाईव्ह
कुसुंबी / जावली


Post a Comment