प्रतिनिधी / श्री.अनिल मोरे
कराड : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते राजयोग शिक्षिका नागठाणे येथील ब्रह्माकुमारी बी.के. डॉ. सुवर्णा दीदी यांना 2025 नारीशक्ती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा साउथ गोवा येथील बैंकोट हॉल येथे उत्साहात पार पडला.
सन 2025 मधील सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी वक्ता म्हणून बी.के. डॉ. सुवर्णा दीदी यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
यापूर्वीही ब्रह्माकुमारी सुवर्णा दीदी यांना देश-विदेशातून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या एक प्रभावी प्रेरक वक्त्या असून, महिला व बालविकास, सामाजिक प्रबोधन, मूल्यशिक्षण तसेच राजयोग ध्यानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.
अनेक शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करत महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अग्रक्रमाने योगदान देत आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही असेच प्रेरणादायी कार्य घडत राहो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment