म्हसवे जिल्हा परिषद गटात राजकीय रणधुमाळीला सुरवात -श्रीहरी गोळे

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी

करहर (जावली) : दि.१९ जावली तालुक्यातील राजकीय दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या गटात मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे तत्कालीन उमेदवार वसंत मानकुमरे हे ८२०० मते घेवून विजयी झाले होते.तर भारतीय जनता पार्टी चे कै.यशवंत पवार या नवख्या उमेदवारांस य अचानक उमेदवारी मिळूनही अनपेक्षित अशी ६४०० मतदान झाले होते. तर जुन्या जाणत्या शिवसेनेचे उमेदवार माजी उपसभापती रविंद्र परामणे यांना १९०० मतदानवर समाधान मानावे लागले होते.

तदनंतर मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने म्हसवे जिल्हापरिषद मतदार संघात बऱ्याच घडामोडी घडल्यात. त्यानंतरच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपावासी झाले.आणि प्रचंड बहुमताने निवडून ही आलेत. आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू चेहरा म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मोठ्या ताकतीने जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी या गटातील गावोगावी नवीन फळीच्या तरुण कार्यकर्त्यांची थेट संपर्क ठेवून अभेद्य अशी निष्ठावान तरुणांची बांधणी केली आहे.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन दोन गट झालेत. त्यातच आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मध्ये राहून सध्या प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ही मानणारा खूप मोठा माथाडीशी संलग्न असलेला वर्ग या विभागात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असल्यामुळे त्यांना लोकांनी भावनिक होऊन म्हसवे गटातून मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभेला ते मताधिक्य टिकले नव्हते.

वसंतराव मानकुमरे जिल्हापरिषद उपाध्यक्ष झाले असले तरी या भागात त्यांची पहिल्यासारखी एकहाती पकड राहिलेली नाही. दत्ता गावडे हे मुंबईस्थित उद्योजक असल्यामुळे त्यांचा उपासभापती पदाचा कार्यकाळ संपल्यावर पुढील काळात ते या भागात बऱ्यापैकी दिसेनासे झाले होते. तर सभापती राहिलेल्या अरुणाताई शिर्के यांचे कार्य, संभाषण व जनसंपर्क जरी मर्यादित असला तरी लोकांमध्ये त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी चांगली राहिलेली आहे.

सध्या म्हसवे हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून जुन्या ओबीसी प्रवर्गातून माजी सभापती सुधीर पंडीत,माजी जिल्हापरिषद सदस्या संगीता चव्हाण यांचे पती सुरेश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून इच्छुक असतील तर भाजपा कडून हुमगावचे माजी सरपंच भाऊसाहेब जंगम, विकास आवले, आखाडचे विद्यमान सरपंच सखाराम गायकवाड,खर्शीबारामुरे चे श्रीरंग पंडीत, हातगेघरचे माजी सरपंच ह. भ. प. शिवाजी दीक्षित, पानस चे विद्यमान सरपंच पती ह. भ. प. संतोष भादीर्गे आणि नव्याने कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळवलेले वसंतराव मानकुमरे आणि दत्ता गावडे हेही ज़िल्हापरिषद लढण्यासाठी व्युह रचना करताना दिसत आहेत.

म्हसवे पंचायत समिती गणातून सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेकांची गोची झाली असली तरी विद्यमान सदस्या माजी सभापती अरुताई शिर्के, तर भाजपा मंडल अध्यक्ष संदीप परामणे, समाधान पोफळे, संतोष महामुलकर हे तिघे ही आपापल्या पत्नी साठी फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटातून संदीप पवार हे सुद्धा स्वतःच्या पत्नीला किंवा अमरदीप तरडे,सुधीर करंदकर यांच्या पैकी एकाच्या पत्नीला निवडणुकीत उभे करायच्या तयारीत असल्याचे दिसते.तर मनसे चे तालुकाध्यक्ष अविनाश पवार हे सुद्धा पत्नीला लढवण्याच्या तयारीत आहेत.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गटाची युती या गणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. रिपब्लिकन पार्टी ची सुद्धा निर्णायक मतपेटी या मतदार संघात आहे. खर्शीबारामुरे गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने आणि पंचायत समितीचे सभापती पद ही खुले झाल्याने या गणातून सर्वाधिक रस्सीखेच या वेळी पाहायला मिळेल.

भारतीय जनता पार्टीचे दोन टर्म अध्यक्ष राहिलेले भाजपाची या विभागात गावोगावी पक्ष बांधणी केलेले आणि संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष म्हणून उठावदार काम केलेले भाजपाचे जेष्ठ नेते माधव भांडारी यांच्या जनजागर प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे वेळोवेळी प्रश्न घेवून काम करत असलेले तसेच सतत लोकांमध्ये संपर्क ठेवून असलेले हतगेघरचे श्रीहरी गोळे, उद्योजक माजी उपासभापती हणमंतराव पार्टे, युवा अध्यक्ष गोरख महाडिक, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्विय सहाय्य्क नितीन गावडे, बाजार समितीचे संचालक प्रमोद शिंदे, महुचे माजी सरपंच विठ्ठल गोळे, रुईघर चे माजी सरपंच अंकुश बेलोशे इत्यादी भाजपा कडून इच्छुक असलेले उमेदवार आहेत. 

तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून खर्शीबारामुरेचे रामदास पार्टे, विठ्ठल गोळे,पानसचे प्रवीण गुजर, हातगेघरचे सुरेश गोळे,महू चे राजू गोळे तसेच शिवसेना शिंदे गटातून तालुका प्रमुख समीर गोळे,शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख नितीन गोळे, शंकर सणस, रवी पार्टे इत्यादी उमेदवारीसाठी नावे चर्चेत आहेत.
आता येत्या काळात महायुती, महाविकास आघाडी यांची युती -आघाडी होतेय की, सर्वच पक्ष वेगवेगळे लढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
महू हातगेघर प्रकल्पचे कालवे पुर्ण होऊन संपूर्ण शेत शिवारात पाणी पोहचणे हा मुद्दा लोकांच्या जिव्हाळ्याचा असून,स्थानिक युवकांना रोजगार, गावोगावच्या अडी अडचणी माहिती असणारा स्थनिक उमेदवार लोकांच्या विविध विकास कामांना निधी कोण देऊ शकेल ? याचा प्रामुख्याने विचार मतदार करतील अशी सध्या या गटात परिस्थिती आहे.

भाजपा विरोधी सर्वच पक्षांची मोट बांधून एकास एक लढत द्यायच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे तयारी करत असले तरी, प्रत्येक गावात वेगवेगळ्या गटातील लोकांशी प्रचंड व थेट व्यक्तिश: संपर्क ठेवून, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जागेवर समान अंतरावर ठेवून काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तरी जोरदार पकड या विभागात पाहायला मिळतेय. नगरपंचायत निवडणुकी नंतर जरी जिल्हापरिषद , पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्या तरी बरीच राजकीय उलथा पालत, समीकरणे तयार होताना दिसतील एवढे मात्र नक्की.


न्यूज मराठी लाईव्ह 
कहर / जावली
प्रतिनिधी / श्री.बजरंग चौधरी 
📲 7038401505





Post a Comment

Previous Post Next Post