वाढदिवसाचा अणा ठाई खर्च टाळून पुरग्रतांसाठी ११०००/- ₹ चा निधी दिला मुख्यमंत्री निधीस

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


केळघर (जावली) : दि २० केळघर गावचे सुपुत्र मा. सरपंच कोविड योध्दा रविंद्र सल्लक यांच्या वाढदिवसा निमित्य केळघर येथे सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांनी आयोजित केला होता या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खंदे समर्थक ज्ञानदेवजी रांजणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे समर्थक लक्ष्मण कडव , महेश रसाळ , सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी , तालुका अध्यक्ष पुंडलिक पार्टे , कार्याध्यक्ष अजित मर्ढेकर , सचिव , विजय सपकाळ , बोंडारवाडी धरण कृती समितीचे राजेंद्र जाधव , मोहन कासुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.


या ज्ञानदेवजी रांजणे बोलताना रविंद्र यांनी कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केले तालुक्यातील सर्वच सरपंच यांचा मेढा येथे मेळावा घेऊन कोविड योद्धा चषक देऊन ना. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा महाराज यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. असा उल्लेख केला व सर्व सरपंच बाबा महाराज यांच्या बरोबर आहेत. सर्व सरपंच यांना त्यांच्या गावच्या विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल बाबा महाराज स्वःता उपस्थित रहाणार होते परंतु घरगुती कार्यक्रमामुळे उपस्तीत रहाता आले नाही. त्यांनी शुभेच्छा संदेश याच्या वतीने रांजणे साहेब सर्व सरपंच यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच रविंद्र सल्लक मा.सरपंच यांना सरपंच यांनी उमेदवारी मागणी केली आहे. महाराज साहेबांना निरोप देण्यात येईल शेवटी महाराज साहेब जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असेल.


लक्ष्मण कडव यांनी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वतीने रविंद्र सल्लक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी विभागातील सरपंच यांनी यांनी कडव यांना महाराज साहेब येथील समस्या सांगीतल्या प्रामुख्याने विद्यार्थांना शैक्षणिक कर्जअडचणी होत आहेत भवानी देवीचा शिक्का असल्या कारणामुळे तर तो प्रश्न मार्गी लावावा तसेच तालुक्यात जास्तीत जास्त सरपंच यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा असी मागणी बजरंग चौधरी यांनी केली तसेच रविंद्र सल्लक यांनी करूणाकाळात सर्वसामान्य लोकांना घराघरात जाऊन आधार देण्याचे कामं त्यांनी केले.

येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये आंबेघर गणात आरक्षण आणायशी पडलेले आहे सर्वसरपंच व सरपंच परिषदेच्या वतीने विनंती केली आहे
रविंद्र सल्लक यांना आंबेघर गणातून उमेदवारी महाराज साहेबांनी दिली तर निश्चित उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल शेवटी महाराज साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही बजरंग चौधरी म्हणाले.

शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी शुभ संदेश पाठविला तो बजरंग चौधरी यांनी वाचून दाखविला आज खरे तर समाजासाठी आपल्या जीवाची परवा न करता रणांगणात उतरणाऱ्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. मला आठवतंय कोरोनाचा काळ घराच्या बाहेर चिटपाखरु देखील पडत नव्हत कोरोना झालेल्या आपल्या आप्तस्वकीयांना रक्ताची माणसं भेटणं टाळत होती अशावेळी रवींद्र सल्लक नावाचा अवलिया आपल्या कुटुंबाची आपल्या जीवाची परवाना न करता पुनवडी गाव असो अथवा कुठल्याही ठिकाणी जिथे जाऊन सॅनिटायझर फवारणीचा विषय असेल किंवा आपलं स्वतःचं वाहन घेऊन जनजागृती करण्याचा विषय असेल स्वतः फिल्ड वरती जाऊन ही कामे करत होती व यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं व ते वाघाचं काळीज खऱ्या अर्थाने रवींद्र सलग यांच आहे असं आवर्जून म्हणावं लागेल व खऱ्या अर्थाने समाजाचे हित डोळ्यासमोर असलेल्या व्यक्तिमत्त्वालाच लोकप्रतिनिधित्व मिळालं तर समाजाचे आणखीन सेवा होऊ शकते त्यामुळे अशा या लढाऊ व्यक्तिमत्त्वाला जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छाआपणास निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना संपूर्ण सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा.

रविंद्र सल्लक शुभेच्छाला उत्तर देताना सर्वाचे मनपासून स्वागत अभिनंदन केले सर्वांची इच्छा असेल व महाराज साहेबांनी उमेदवारी दिली तर निवडणूक लडू महाराज साहेब आज येणार होते आपणा सर्वांना महायत आहे दिपावली कार्यक्रम प्रत्येकाच्या घरात आहे तरी लोकं महाराज साहेबांना भेटण्या करीता जात आहे तसेच महाराज साहेब ज्या जिल्हाचे पालकमंत्री आहेत या जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलेले आहे अशा परिस्थितीमध्ये वाढदिवस मोठ्या प्रमाणात करावयाचा नाही असा निर्णय घेऊन अनाठाई खर्चाला फाटा देऊन ११००० रुपये मुख्यंत्री सहायता निधीस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे .

सर्व सरपंच ग्रामस्थ यांचे स्वागत आभार बजरंग चौधरी यांनी मानले. मोहन कासुर्डे , गणपत ओंबळे , बंडू ओंबळे , संजय बेलोसे नाना , चंद्रकांत चव्हाण , मा. उपसरपंच बजरंग पार्टे ज्ञानेश्वर बेलोशे केळघरचे मा. सरपंच नाना जांभळे जय दुर्गा माता मित्र मंडळ केळघर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

न्यूज मराठी लाईव्ह 
केळघर / जावली

Post a Comment

Previous Post Next Post