पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्....; आणि कार थेट छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू साताऱ्याच्या तेटली गावात शोककळा


सातारा : जिल्ह्यातील तेटली गावात एक विचित्र अपघात झाला आहे. यात पंक्चर झालेलं कारचं चाक बदलताना अचानक जॅक निसटला आणि कार थेट छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रणय शंकर भोसले असे 25 वर्षीय मयत तरुणाचं नाव असून या घटनेने तेटली गावात शोककळा पसरली आहे.

पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय भोसले सातारा जिल्ह्यातील जावळीच्या तेटली गावातील रहिवासी असून ते हॉटेल व्यवसाईक होते. अशातच प्रणय बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना आपल्या गाडीचं चाक पंक्चर झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांची गाडी त्यांच्या हॉटेलबाहेरच पार्क होती. यावेळी त्यांनी मेकॅनिकला न बोलवता स्वतःच गाडीचं पंक्चर झालेलं चाक बदलण्याचा निर्णय घेतला. 

त्यासाठी गाडी वर उचलण्याची ते गाडीखाली शिरले आणि जॅक पुन्हा वर चढवू लागले. मात्र त्याच वेळी अचानक जॅक मूळ जागेवरून सटकून बाजूला पडला आणि गाडी थेट त्याच्या छातीवर पडली. गाडीचा संपूर्ण भार प्रणयच्या छातीवर आल्याने त्यांनी मदतीसाठी मोठ्यांना आवाज दिला. त्याच वेळी प्रणय यांच्या किंकाळ्या ऐकून त्यांच्या पत्नीने हॉटेलमधून बाहेर धावत आली. सोबत त्यांचे वडीलही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

....पण तोपर्यंत उशीर झाला, तेटली गावात शोककळा
दरम्यान, या दोघांनी गाडी वर उचलण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करत प्रणयला बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हि बातमी कुटुंबियांना समजताच भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तेटली गावात शोककळा पसरली आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

Previous Post Next Post